लहान माळीवाडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। धरणगाव शहरातील लहान माळीवाडा परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता माळी समाज बांधवांसह महिलांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची मागणी
यावेळी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यालया उजाळा देत म्हणाल्या की, जळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आदी महापुरुषांचे स्मारक बांधण्यात आलेले आहे. परंतु सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बांधण्यात आलेले नाही अशी खंत व्यक्त करत सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या तर महिला आज उच्चशिक्षित होवून विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करताना दिसल्या नसत्या, दरम्यान धरणगाव नगरपारिषद प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी माळी समाजातील महिलांनी केली आहे.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
माजी नगरसेविका कल्पना महाजन, नंदनी पाटील, सुषमाबाई महाजन, छायाबाई महाजन, गंगुबाई महाजन, मायाबाई महाजन, कमलबाई महाजन, देवकाबाई महाजन, सुरेखा महाजन, अनुबाई महाजन, संगीताबाई महाजन, ताराबाई महाजन, शोभाबाई महाजन, सरलाबाई महाजन, कल्पना महाजन, वैशाली पाटील, संध्याबाई सोनार. हिराबाई महाजन यांच्यासह माळी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content