Home धर्म-समाज यावल महसूल प्रशासनातर्फे महामानवास अभिवादन

यावल महसूल प्रशासनातर्फे महामानवास अभिवादन

0
36


यावल प्रतिनिधी । येथील नविन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमिताने आज महसूल प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दरम्यान या प्रसंगी महसुलचे नायब तहसीलदार आर .डी . पाटील , दिपक बाविस्कर ,यावल क्षेत्राचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावल शहर तलाठी ईश्वर कोळी ,कार्यालयीन कर्मचारी रामा कोळी, तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे , लिपिक सुरज जाधव यांनी या प्रसंगी उपस्थित राहुन भारतरत्न डॉ . बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. 

यावल पोलीस स्टेशनच्या कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पोलिस अमलदार सुशिल घुगे, सहाय्यक फौजदार अजीज शेख , पोलीस अमलदार भुषण चव्हाण ,विजय वाढे, संजय तायडे , असलम खान, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलीस अमलदार अशोक बाविस्कर , सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी यांच्यासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी आदीनी महामानवाच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

 


Protected Content

Play sound