Home Cities जळगाव सरदार पटेल जयंतीनिमित्त लेवा भवनात सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन

सरदार पटेल जयंतीनिमित्त लेवा भवनात सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन


जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखंड भारताचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता जळगाव शहरात एकतेचे आणि आदराचे वातावरण पाहायला मिळाले. पटेल लेवा भवनात आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय मान्यवर आणि लेवा पाटीदार समाज बांधवांनी एकत्र येत सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन केले. लेवा भवन येथे आयोजित या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि माजी महापौर सीमाताई भोळे यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय मान्यवरांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत सरदार पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यामुळे राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

यावेळी लेवा पाटीदार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले श्रद्धास्थान असलेल्या सरदार पटेल यांच्या स्मृतींना वंदन केले. सरदार पटेल यांनी देशाच्या एकत्रीकरणामध्ये दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे जळगावात देशभक्तीमय आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound