भुसावळ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा यांनी नुकतीच येथील लोकोमोटीव्ह वर्कशॉपला भेट देऊन निरीक्षण केले. त्यानंतर वर्कशॉपला ग्रीन कंपनी रेटिंग ‘गोल्ड’ प्राप्त केले आहे. त्याबद्दल महाप्रबंधकांकडून दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
हे रेटिंग ग्रीन इमारतीच्या वैशिष्ट्यांवर आधारित असते. इमारतींची पर्यावरणाच्या प्रभावांना कमी करण्याची क्षमता तसेच त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची क्षमता यावर दिले जात असते. यावेळी हिंदी भाषेतील वार्षिक विशेषांक ‘पारिजात’ चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. शर्मा यांनी यावेळी येथील रेल्वेचे अधिकारी, पर्यवेक्षक आणि कर्मच्यार्यांचे कौतुकही केले.