मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना बाधीतांचे उपचार अथवा त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराबाबत अनेक गैरसमज व त्यातही अनाठायी भिती असतांना येथील मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी स्वत: पीपीई किट घालून वृध्दाचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
मूळचे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील दाम्पत्य मुक्ताईनगरात वास्तव्यास असणार्या त्यांच्या मुलाकडे आले होते. यातील महिला ती कोरोना पॉझिटीव्ह आली, तर तिचे पती मात्र निगेटीव्ह आले होते. तथापि, त्या वृद्धाला त्रास होवू लागल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना मंगळवारी रात्री अॅम्बुलन्सने मुक्ताईनगरकडे आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत रूग्णाचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेला समजले.
या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉ.योगेश राणे यांनी तहसीलदार शाम वाडकर व मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, संबंधीत मृत वृध्दाच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यासाठी कचरत असल्याचे पाहून स्वत: मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पीपीई किट घालून स्मशानभूमि गाठली. आणि त्यांचे धाडस पाहून अन्य कर्मचारी देखील समोर आले. यामुळे रात्री उशीरा संबंधीत रूग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्याधिकारी पुढे सरसावल्याचे पाहून अच्युत नीळ, सचिन काठोके, सुनील चौधरी, किशोर महाजन, राहुल पाटील, रत्नदीप कोचुरे, गणेश कोळी, गोपाल लोहेरे या कर्मचार्यांनी त्यांना मदत केली.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update