पेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश : प्रेषीत वारकेची दणदणीत कामगिरी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पेस अकॅडमीच्या प्रेषीत प्रशांत वारके या कुशाग्र विद्यार्थ्याने जेईईच्या मेन्स आणि ऍडव्हान्स्डमध्ये जोरदार कामगिरी करत देशभरात २१७ वी रँक मिळवली असून त्याचा पेस अकॅडमीच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.

या संदर्भातील वृत्त असे की, आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी ख्यात असलेल्या पेस अकॅडमीने यंदा देखील अतिशय उत्तम रिझल्टची आपली परंपरा कायम राखली आहे. यात प्रेषीत प्रशांत वारके याने देशभरात २१७ व्या क्रमांकाची रँक मिळवली आहे. यासोबत एकूण सात विद्यार्थ्यांनी आयआयटीत प्रवेश मिळवला आहे. यात प्रेषीत सोबतच यश पाटील ( ऑल इंडिया रँक-३७०३ * ); तनिष्का डहाके ( ऑल इंडिया रँक-३९३३* ); पार्थ बाविस्कर ( ऑल इंडिया रँक-४७५३* ); देबोर्ना दास ( ऑल इंडिया रँक-४४७७ * ); साहिल पाटील ( ऑल इंडिया रँक-५०८३ *) आणि विजय पाटील ( ऑल इंडिया रँक-५८४९ * ) या विद्यार्थ्यांनी देखील उज्वल यश संपादन केले आहे.

दरम्यान, यासोबत पेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट प्रवेश परिक्षेत देखील चांगले यश संपादन केले आहे. यात आशुतोष मालुंजकर एआयटीएस ( ६६०); लाजवंती धांडे ( ६२२); पायल पाटील (६१३); क्रिष्णा पाटील (६०५); भूमिका चौधरी ( ५८९); ऋषीकेश पाटील (५७३) आणि अनुष्का महाजन (५२०) यांनी घवघवीत यश मिळविले.

या सर्व गुणी विद्यार्थ्यांचे पेस आणि जयिष्णू गुरूकुलचे संचालक सौ. सविता वाणी व दिलीप वाणी यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व गुणवंतांचा पेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पेस व जयिष्णू गुरूकुलमध्ये पाचवी ते दहावीच्या दरम्यानचे विद्यार्थी तसेच, दहावीतून अकरावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटी/मेन्स/आयआयटी/नीट आणि फाऊंडेशन यासाठी वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश सुरू आहेत. दहावीतुून अकरावीत जाणार्‍या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येत असून ही बॅच ९ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. यासोबत नीट/मेन्स/ऍडव्हान्स/रिपीटर बॅच १५ जुलैपासून सुरू करण्यात येत असून यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content