फैजपूर ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अवघ्या ६ वर्षांची जोया उमर शेख हिने आपल्या कोवळ्या वयात संपूर्ण श्रद्धेने रमजान महिन्यातील रोजा ठेवण्याचा निर्धार केला. तिच्या या भक्तिभावाने आणि धैर्याने संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) पाळतो. हा उपवास अन्न-पाण्याचा त्याग करून श्रद्धेने केला जातो. सहा वर्षांची जोया हिने हा उपवास पाळत आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या अभिमानास पात्र ठरली आहे.
जोया हिच्या आई-वडिलांनी सांगितले की, लहान वय असूनही तिने मोठ्या जिद्दीने आणि श्रद्धेने रोजा पाळण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णही केला. त्यांच्या मते, तिने स्वतःहून रोजा पाळण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तिच्या चिकाटीमुळे त्यांनी तिला प्रोत्साहन दिले.
जोया हिच्या या भक्तीला आणि आत्मशिस्तीला पाहून नातेवाईक, शेजारी आणि मित्रपरिवाराने तिचे विशेष कौतुक केले. तिच्या या धैर्यामुळे ती इतर मुलांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. फैजपूर परिसरात तिच्या या धार्मिक निष्ठेबद्दल सर्वत्र चर्चा असून, तिचे अभिनंदन केले जात आहे.