Home क्राईम आजोबांची नातवाकडून हत्या; मृतदेह नदीत फेकला

आजोबांची नातवाकडून हत्या; मृतदेह नदीत फेकला


वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नातवाने संपत्तीच्या लोभापायी आपल्या वृद्ध आजोबांची हत्या करून त्यांचा मृतदेह नदीत फेकल्याची भयंकर उजेडात आली आहे. या प्रकरणी आरोपी नातवासह ४ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अडाण धरणात मंगळवारी एका ७० वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. या मृतदेहाच्या अंगावर जखमा व त्याचे पायही बांधले होते. त्यामुळे त्याचा घातपात झाल्याचा संशय होता.

पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह मानोरा येथील प्रल्हाद वीर यांचा असल्याचे निष्प्नन झाले. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरात रक्ताचे डाग आढळून आले. तसेच वीर यांची पत्नीही बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास केला असता प्रल्हाद वीर यांची हत्या त्यांचाच नातू प्रतीक संतोष वीर व त्याचे सहकारी विकास भगत, जगदीश अनिल देवकर, जीवन फडके यांनी संपत्तीच्या वादातून केल्याचे उघड झाले. प्रल्हाद वीर यांच्या पत्नी सध्या बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांचीही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound