पाचोरा प्रतिनिधी । श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानांतर्गत दि. १४ रोजी तालुका अभियान अध्यक्ष महावीर गौड यांच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तालुक्यातील असंख्य भाविक सहभागी झाले होते.
श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र, अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरा करिता तालुका स्तरावर श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली आहे. श्रीराम मंदिर निर्माण निधी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व नागरिकांनी या अभियानास मदत करावी जेणेकरून जास्तीत जास्त निधी तालुक्यातील उपलब्ध व्हावा व प्रत्येक घरा पर्यंत राम सेवक पोहचावा या उद्देशाने सदर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान दि. १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
मोटारसायकल रॅली ही पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयापासुन मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. शहरातील शिवाजी नगर, जारगांव चौफुली, गाडगेबाबा नगर, महाराणा प्रताप चौक, चिंतामणी काॅलनी, संभाजी महाराज चौक, देशमुखवाडी, बाहेरपुरा आठवडे बाजार, कृष्णापुरी, भारत डेअरी, शिव काॅलनी, गांधी चौक, जामनेर रोडहुन अभियान कार्यालया जवळ रॅलीची सांगता करण्यात आली. सदर रॅलीत संघ चालक दिनेश अग्रवाल, श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान तालुका प्रमुख महावीर गौड, कार्यवाहक राजु बाळदकर, सुनिल पाटील,सुनिल सराफ, मनिष काबरा, संतोष मोरे, विकास लोहार, गिरीश बर्वे, हर्षल पाटील, हर्षवर्धन ब्राम्हणे, विनोद ठाकुर, राजु घोडके, भरत प्रजापत, यश तिवारी, राज तिवारी सह असंख्य भाविकांनी सहभाग नोंदविला होता.
श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानास सुरुवात झाली असुन तालुक्यात आपल्या घरापर्यंत राम सेवक येणार असुन आपल्या घरा पर्यंत आलेल्या राम सेवकाची शहानिशा करूनच आपण निधी समर्पीत करावा असे आवाहन पाचोरा तालुका अभियान प्रमुख महावीर गौड यांनी जनतेला केले आहे.