Home Cities जळगाव ग्रह-राशी नक्षत्र मंदिरात भव्य सोहळा ; मयूर महाराजांचा गादीपट्टाभिषेक 

ग्रह-राशी नक्षत्र मंदिरात भव्य सोहळा ; मयूर महाराजांचा गादीपट्टाभिषेक 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विश्वातील एकमेव ग्रह-राशी नक्षत्र मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक ३१ मार्च रोजी मंदिराचे गादीपती मयूर महाराज यांचा गादीपट्टाभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या सोहळ्यास राज्यभरातून आलेल्या भक्तांची मोठी उपस्थिती होती.

ब्रम्हावधूत डॉ. सुमंताश्रमजी महाराज यांच्या हस्ते हा गादीपट्टाभिषेक पार पडला. यावेळी त्यांनी मयूर महाराज यांचे ‘मयूरगोविंदजी’ असे नामकरण करत त्यांना आध्यात्मिक परंपरेचा नवा मान प्रदान केला. या नामकरणामुळे उपस्थित भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सोहळ्यादरम्यान श्रीगुरुगीता कथेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या धार्मिक कार्यक्रमात ब्रम्हावधूत डॉ. स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांची गूळ आणि रुद्राक्ष यांच्या माध्यमातून तुला करण्यात आली. हा पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडला. त्याआधी महाराजांना पालखीतून मंडपात आणण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होत आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली. मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भजन-कीर्तनामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले.


Protected Content

Play sound