खिरवड ग्राम पंचायत भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या नोटीसा

WhatsApp Image 2019 05 22 at 1.58.09 PM

रावेर(प्रतिनिधी) तालुक्यातील खिरवड येथे २०१७/१८ मध्ये झालेल्या सुमारे १७ लाखाचा अपहार प्रकरणी तात्कालीन,सरपंच, उपसरपंच  यांना भ्रष्टाचार केल्याच्या नोटीसा काढण्यात आले असुन तात्कालीन ग्रामसेवक यांनी देखिल लाखो रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी चौकशी अधिका-ऱ्यांनकडून तिघांना स्वतंत्र कारवाई पूर्वीची नोटीसा पाठवल्या असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द झाले आहे.

 

खिरवड येथे २०१७/ १८ मध्ये सरपंच,उपसरपंच,व ग्रामसेवकावर अपहार केल्याचा ठपका या नोटीसांमध्ये ठेवण्यात आला आहे विद्यमान सरपंचाच्या तक्रारी नंतर झालेल्या चौकशीत हे सर्व सिध्द झाले असुन प्रभारी गट विकास अधिकारी यांनी या प्रकरणात चौकशी अधिकारी असुन त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे दि ९ ऑक्टोबर २०१८ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत जळगाव यांनी संबधीत तिघांना कारवाई पूर्वीची नोटीसा बजावल्या असून त्यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्यावर अनुक्रमे   ५ लाख २९ हजार तर उपसरपंच ३ लाख ५ हजार रूपयाचा  असा एकुण  ८ लाख ३४ हजार ८३६ रूपयाचा अपहार केल्याची स्पष्ट टिपणी करण्यात आली आहे तर ग्राम सेवकाची अपहारची रक्कम कळु शकली नाही

पुढील कारवाईकडे लक्ष
कर्तव्य दक्ष प्रभारी गट विकास अधिकारी यांना जिल्हा प्रशासनाने चौकशी अधिकारी म्हणून नेमले नंतर यांनी आपले चौकशीचे चक्र वेगाने फिरवत दूध-चे-दूध आणि पाणी-चे-पाणी करून दि 9 /10/2018 रोजीची तत्कालिन ग्राम सवेक,सरपंच व उपसरपंच या तिघांना स्वतंत्र कार्यवाही पूर्वीची नोटीसा पाठवून अपहार झाल्याचे सिध्द केले त्यामुळे आता या सर्वां वर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे यापूर्वी जिल्ह्यातील ग्राम पंचायत अपहार प्रकरणी सरपंच,ग्राम सेवक तुरुंगाची हवा खात असल्याने चौकशी अधिकारी हबीब तडवी यांच्या कारवाई कडे लक्ष लागले आहे

Add Comment

Protected Content