ग्रामपंचायतींनी दिव्यांग बांधवांचा निधी वितरीत करावा; शिवसेनेची मागणी

bodwad news

बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दिव्यांग बांधवांना निधी मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

शासनाच्या ग्रामविकास खात्याचे आदेश असतांना देखील ग्रामपंचायत हद्दीत राहणार्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवुन निधी खर्च करण्याकडे तालुक्यातील ग्रामपंचायती दुर्लक्ष करत आहेत. दिव्यांगांसाठी स्व:उत्पनातील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगासाठी खर्च करा, असे आदेश ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंतायतीला दिले असले तरी बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीकडुन ग्रामविकास विभागाच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याची तक्रार गटविकास अधिकार्यांकडे शिवसेनेने केली आहे.

तालुक्यातील ग्रामसेवकांचि तातडीची बैठक बोलावुन दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी देण्यासंदर्भात आदेश द्यावे अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.

 

अन्न धान्य पुरवठा अधिकार्यांचा निषेध !
एणगाव येथील रहिवाशी विष्णु सकपाळ दिनांक 1 रोजी पुरवठा अधिकार्यांकडे गेला असता त्याला अपमानास्पद वागणुक दिली गेली. यामुळे तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर प्रकाराचा शिवसेनेने निवेदन देत तिव्र निषेध नोंदवला आहे येत्या दिवसांत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल अधिकार्यांना भेटुन त्याचा जाब विचारणार आहे. निवेदन देतांना वृषाली किंगे, ऊज्वला वाघळे, वसंत वाघळे, भागवत मुर्हेकर, भागवत सोनवणे, मंगलसिंग पारधी, जगन्नाथ करंडे या दिव्यांग बांधवांसोबत शिवसेना ऊपजिल्हा संघटक अस्लम शेख, तालुका संघटक जितेंद्र पाटिल, गजानन भोंडेकर, योगेश राजपुत, नईम खान, राजेंद्र किंगे, शिवसिंग पारधी , सोपान वाघळे, अमोल व्यवहारे यांच्यासहित नागरिक ऊपस्थित होते.

Protected Content