Home धर्म-समाज अ.भा.ग्राहक पंचायत सदस्यपदी विजय माळी यांची निवड

अ.भा.ग्राहक पंचायत सदस्यपदी विजय माळी यांची निवड

WhatsApp Image 2019 06 02 at 15.26.23
WhatsApp Image 2019 06 02 at 15.26.23

WhatsApp Image 2019 06 02 at 15.26.23

बोदवड प्रतिनिधी । अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकरणीची बैठक आज रविवारी 2 जून रोजी प्रभू ऍग्रो इंडस्टीज बोदवड येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक सरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत बोदवड येथील माळी समाजाचे कार्यकर्ते विजय प्रकाश माळी यांची ग्राहक पंचायतीच्या जिल्हा कार्यकारणीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत यांची होती उपस्थिती
बैठकीत हरिओम जैस्वाल, ज्ञानेश्वर घोगले, प्रा.बी.जी.माळी, नितीन कोल्हटकर, प्राचार्य सुरेश वराडे, ॲड. ईश्वर पाटील, ॲड. अर्जुन पाटील, ॲड. अमोलसिंग परदेशी, आबा माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. विजय माली यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र शासनातील राज्य अन्न आयोग आणि ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे, नगरसेवक कैलास माळी, सुनील बोरसे, देवेंद्र खेवलकर, संजय वराडे, तेजस नेरकर, भूषण नेरकर, राहुल जावरे, विश्वनाथ नेरकर, दिगंबर माळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound