Home राजकीय अ.भा.ग्राहक पंचायत रावेर तालुका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अ.भा.ग्राहक पंचायत रावेर तालुका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0
43

WhatsApp Image 2019 05 14 at 4.15.00 PM

रावेर (प्रतिनिधी) अ.भा.ग्राहक पंचायत रावेर तालुक्याची बैठक लक्ष्य करियर अकॅडमी छोरिया मार्केट रावेर येथे , महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

रावेर येथे झालेल्या या बैठकीत रावेर तालुक्यात ग्राहक जागरण मेळावे आयोजित करणे, राष्ट्रीयकृत बँकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविणे ,ग्राहक पंचायतीच्या सभासदांची संख्या वाढविणे,ग्राहक जागृतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस अ.भा.ग्राहक पंचायत रावेर तालुका उपाध्यक्ष ऍड. धनराज पाटील,रावेर ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक विजय पाटील, तालुका सह संघटक डॉ. गुलाबराव पाटील, सदस्य प्रल्हाद महाजन, व्ही.के.पाटील, विनोद चौधरी,यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते. प्रास्ताविक ऍड. धनराज पाटील ,सूत्र संचालन विजय पाटील यांनी तर आभार प्रल्हाद महाजन यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound