पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, येथे इंग्रजी विषय अंतर्गत पेपर मार्बलिंग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यात इयत्ता ६ वी इंग्रजी या विषयातील ३.५ अट द सायन्स फेअर या घटकातील पेपर मार्बिंग ऍक्टीव्हीटीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. इंग्रजी विषयासोबत कला व विज्ञान या विषयांची सांगड घालून सदर अॅक्टीव्हीटी विद्यार्थ्यां समोर सादर करण्यात आली.
यावेळी इयत्ता सहावीचे सर्व विद्यार्थी या प्रात्यक्षिक प्रयोगासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या मार्गदरशनाखाली सकाळ सत्रातील या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन. आर .पाटील, इंग्रजी शिक्षिका व्ही. एस. कुमावत, शितल संदीप महाजन, चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील यांनी पेपर मार्बिंग साठी व्यवस्था करून, रंगनिर्मिती कशी असते यासाठी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून घेतले. वैशाली कुमावत यांनी विद्यार्थ्यांना याबाबतीत सविस्तर माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती व उत्सुकतेने सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला.