जळगाव प्रतिनिधी । सरकारने शेतकर्यांची दिशाभूल थांबवून वास्तववादी विचार करत, बियाणे द्यावेत असे आग्रही प्रतिपादन मनीषा तोकले यांनी केले. त्या जिल्हा महिला असोसिएशनतर्फे आयोजित शेतकरी आणि शेतमजूर महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या.
आज विश्व महिला मंडळाच्या प्रांगणात शेतकरी आणि शेतमजूर महिलांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी होते. यात महिला किसान अधिकार मंचच्या सदस्या बीड येथील मनीषा तोकले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतरी व शेतमजूर महिलांच्या आर्थिक व सामाजिक समस्या या विषयावरील आपल्या भाषणातून सरकारने योग्य कृषी धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. याप्रसंगी जिल्हा महिला असोसिएशनच्या राजकुमारी बाल्दी, सरला नगरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पहा- शेतकरी व शेतमजूर मेळाव्याचा हा व्हिडीओ.