पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी प्रचारांसाठी आलेले गोंविदा उमेदवारांचे नाव विसरले. अखेर शेजारी बसलेल्या भाजप आमदार उमा खापरे यांनी त्यांना श्रीरंग बारणे यांचे नाव सांगितले. मात्र आता उमेदवाराचे नाव लक्षात नसेल तर गोविंदाला बोलावून काय साध्य झाले? असा प्रश्न केला जात आहे.
श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर गोविंदावर स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली. तर मावळमध्ये येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. इथे महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे आणि महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत होणार आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना इथे रंगणार असल्याने याकडे लक्ष लागले आहे.
मावळमध्ये प्रचारासाठी आलेला गोविंदा उमेदवाराचे नावच विसरला
7 months ago
No Comments