नवी मुंबई प्रतिनिधी | २०२४ सालच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच सरकार सत्तारूढ होणार असून उध्दव ठाकरे हेच सीएम राहतील असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केले असून या संदर्भातील एक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात बोलतांना एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी पुणे येथील एका अनौपचारीक प्रसंगात दिलेली माहिती मी आपल्याला सांगत आहे. पवार साहेब म्हणाले की, महाविकास आघाडी २०२४ सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तारूढ होणार असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच राहतील असे पवार साहेब म्हणाल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन केलेला गौप्यस्फोट हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी सुध्दा उध्दव ठाकरे हा पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील असे सांगितल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनीही याला दुजोरा दिल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.