अकोला (वृत्तसंस्था) ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचणी येताय. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर आले आहेत. फडणवीस म्हणाले, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना दुष्काळात देण्यात येणारी सर्व मदत आताही देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना चांगली मदत हवी असेल तर, 6 तारखेपर्यंत 100 टक्के पंचनामे करण्याचे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले. तसेच ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचणी येत असल्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे असल्याचे गरजेचे आहे.