अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रती पंढरपूर विठ्ल रुखमाई वाडी संस्थान चे आद्य पुरुष असून संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेऊन फिरणारे ते एकमेव संत आहेत.महाराजांचे अमळनेर हे मुख्य स्थान असले तरी पंढरपूर पासून महाराष्ट्रभर महाराजांचे प्रस्थ असल्याने सर्वत्र त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत प पू संत श्री प्रसाद महाराज हे सखाराम महाराजांचे गादी पुरुष असल्याने त्यांनी हा वारकरी संप्रदायाचा वारसा अखंडितपणे सुरू ठेवला आहे.
अमळनेर करांची विशेष श्रद्धा सखाराम महाराज यांच्यावर असल्याने अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत सखाराम महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मां. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. सदर मागणी आणि महाराजांवरील भक्तांची श्रद्धा लक्षात घेता काल शुक्रवार दिनांक 4 रोजी मुंबई येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मंत्रिमंडळाने सदर निर्णय घेऊन भाविक भक्तांच्या भावना जोपासल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन,पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचेसह मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.