शासनाचे शिष्टमंडळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दाखल

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. ओबीसी नेत्यांसोबत काल राज्य सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले आहे.

Protected Content