बोदवड, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रेशन कार्डबाबत बऱ्याच तक्रार तहसीलदार यांच्याकडे येत असल्यामुळे तक्रारीचे निवारण करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि. १४ ते १७ फेब्रुवारी या दरम्यान तालुक्यातील ऐनगाव, नाडगाव, शेलवड, मनूर, बुद्रुक, मुकतळ, भानखेडा येथे ‘रेशन कार्ड पुरवठा विभागा’च्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः तहसीलदार योगेश टोपे उपस्थित राहून समस्या सोडवत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘पुरवठा विभाग’ संदर्भात लोकांशी निगडित असलेला विषय जाणून घेत तक्रार निवारण करण्यासाठी तालुक्यातील गावाचा आढावा घेतला जाणार आहे.. नाडगाव, कोल्हाडी, चिंचखेड सिम, शिरसाळे, सोनोटि, हिंगणे, आमदगाव येथे शिबिर संपन्न होणार आहे.
अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध योजना मार्फत धान्य वाटप केले जावे. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोचविण्याकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.