एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जवखेडे सिम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक ही दोन वर्षांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व माजी लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनलचचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार हे बहुमताने निवडून आले होते.
ठरल्याप्रमाणे चेअरमन अभिमन रामदास आमले तसेच व्हाईस चेअरमन प्रेमराज वेडू पाटील यांनी राजीनामा दिल्याने चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली व सर्व संचालकांच्या उपस्थितीत गोपीचंद बळीराम आमले यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज व उत्तम चिंतामण सोनवणे यांचा व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुजा बाविस्कर मॅडम यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, माजी सरपंच दिनेश आमले, संचालक अभिमन आमले, प्रेमराज पाटील, हिम्मत पाटील, हिम्मत चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, मुरलीधर गोसावी, कैलास पाटील, अनिल पाटील, लिलाबाई पाटील, अलकाबाई पाटील, तज्ञ संचालक प्रकाश शिंपी तसेच जवखेडेसिम ग्रामपंचायत उपसरपंच विकास पाटील, सदस्य रवींद्र पाटील, अर्जुन भागवत पाटील, संजय कैलास पाटील, रवींद्र सुकलाल चौधरी, ग्रामस्थ युवराज नगराज पाटील, रघुनाथ चौधरी, हिरामण सखाराम पाटील, लोटन राजाराम पाटील, ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनार, पितांबर चौधरी, बापू पाटील, सुभाष पाटील आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.