वॉशिंग्टन (वृत्तसेवा) गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. Gmail, Google Drive अन् you tube काम करत नसल्याच्या अनेक युजर्सनी तक्रारी केल्या आहेत. जीमेलवर साइन इन केल्यानंतरही या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तसेच गुगलशी संलग्न असलेल्या अनेक वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ घेत असल्याच्याही तक्रारी युजर्सने केल्या आहेत.दरम्यान, नेटकरांच्या तक्रारींची गुगलनं तातडीनं दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.
ई-मेल सेंड होत नाहीत. मेल येत नाहीत,आलेले व पाठविलेले ई-मेल व्हिडिओ, डॉक्युमेण्ट्स डाउनलोड होत नाहीत,गुगल मॅप्सवर ठिकाणे शोधणे कठीण झालंय, यू-ट्यूबवर व्हिडिओ अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे, अशा तक्रारी युजर्सकडून आल्या आहेत. त्यावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल,’ असा खुलासा गुगलने केला आहे. पहिल्यांदा आपले नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलने युजर्सला दिला आहे. त्यानंतर गुगलनेही या सर्व प्रकारासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही जीमेल हाताळण्यास होत असलेल्या समस्यांची चौकशी करत आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही आपल्याला माहिती देऊ. जीमेल लॉगिन होत असले तरी वापर असताना एरर येत आहेत. एकदा क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एखादा मेल ओपन होत आहे.