रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा गावात एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र हरी कवडे (वय ४३, रा. निंभोरा ता.रावेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. १८ ते १९ मार्चच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कवडे यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून १२ हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ‘गहू मणी’ असलेले पाकीट असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांची केवळ जितेंद्र कवडे यांच्याच घरात चोरी केली नाही, तर गावातील इतर दोन घरांनाही लक्ष केले. किरण लक्ष्मण पाटील आणि विनायक वामन तायडे यांच्या घरांच्या मागील दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिथून नेमका काय माल गेला किंवा चोरट्यांचा प्रयत्न फसला याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान कोळी हे करीत आहे.



