Home Cities जळगाव रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी

रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी

0
24

riksha chalak

जळगाव प्रतिनिधी । आपल्या रिक्षात आढळून आलेली पर्स पोलिसांच्या माध्यमातून संबंधीत प्रवाशांना पोहचवण्याचे काम रिक्षा चालक हाजी युनुस खान यांनी केले आहे.

याबाबत वृत्त असे की, शुभांगी अमोल दिडोकर राहणार चिंचवड पुणे या जळगावात आल्या असता आपली पर्स रिक्षात विसरून गेल्या. दरम्यान, ही बाब रिक्षा चालक हाजी युनूस खान जमशेद खान यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस स्थानकातील एपीआय आरक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शुभांगी दिडोकार यांना बोलावून ही पर्स परत केली. त्यांच्या पर्समध्ये ४५०० रूपये रोख, ८ हजार किमतीचा मोबाइल, चांदीचे कडे व एटीएम होते. हाजी युनुस खान यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound