मुंबई प्रतिनिधी । भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीची धमाकेदार ऑफर आणली आहे. ते म्हणजे, कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हा निर्णय उद्यापासून (दि.10) लागू करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती भारतीय स्टेट बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा हा यासाठी बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून ही चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहे. नवे दर उद्या १० ऑक्टोबरपासून अंमलात येत आहेत. मंदीच्या गर्तेत सापडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर या दिवशी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व बँकेने रेपो दरात २५ आधार अंक घटवून ५.१५ टक्के केला होता. हे पाहता या आर्थिक वर्षातील कपातीचा आकडा १३५ पोहोचला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांत पहिल्यांदाच इतका कमी रेपो दर कपातीचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.