मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. राज्य सरकारने साकारात्मक पाऊल उचत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रूपये वितरीत करण्याचे निर्णय घेतला असून असे परिपत्रकच काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पगार न झाल्यास एसटी संघटनांचा आक्रमक पवित्रा होता. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. मात्र ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन ७ ते १० तारखे दरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिले होते. बमात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. यामध्ये याही महिन्यात १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली. त्यानंतर ३०० कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आजच होणार आहेत.