रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील महावितरण रसलपुर कक्ष अंतर्गत आदिवासी व गरीब कुटुंबाना घर घर वीज कनेक्शन मिळावे, म्हणून पंतप्रधान यांनी “सौभाग्य” ही महत्वकांशी योजना अंबलात आणली. मात्र दोन वर्षात महावितरणच्या उदासिनतेमुळे या योजने अंतर्गत आदिवासी भागातील 11 गावात फक्त 221 वीज कनेक्शन देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, आदिवासी कुटुंबाच्या घरात वीज पोहचावी, यासाठी 25 सप्टेंबर 2017 रोजी सौभाग्य योजना आणली. ही योजने मार्फत जनते पर्यंत विज पोहचावी, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रचंड प्रयत्न केले. परंतू महावितरणचे रसलपुर कक्ष याबाबत प्रचंड उदासीन दिसत असून आदिवासी भागात आतापर्यंत केवळ 221 विज कनेक्शन दिले आहे. या भागतील लोकांना या योजने बद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे या योजनेचे महत्व गरीब जनतेपर्यंत पोहचविण्यात येथील महावितरण सपशेल फेल ठरली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
अजून एकही कनेक्शन नाही
आदिवासी भागातील महावितरण रसलपुर कक्ष अंतर्गत येणाऱ्या आभोडा-1 बक्षीपुर-12, खिरोदा-24, मुंजलवाडी-23, पाल-34, रमजीपुर-53, रसलपुर-58 आणि जिन्सीला-1 सौभाग्य मार्फत कनेक्शन दिले आहे. तर गारखेडा, मोरव्हाल, निमड्या या आदिवासी गावात अजुन एकही कनेक्शन दिलेले नाही.