जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र चौकातील व्यावसायिकाचे गोडावूनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ५८ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदिरासमोर मिरा आनंद जोशी या वास्तव्यास आहे. घराच्या बाजूलाच त्यांचे सामान ठेवण्याचे गोडावून आहे. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडावूनचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच याठिकाणाहून चोरट्याने ३० वर्षांपुर्वी खरेदी केलेले ५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, २ तोळ्याचा पोहेहार, ३ तोळ्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅम वजनाचे डुल व १ तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. मिरा जोशी यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे .