एस.टी.प्रवासात विवाहितेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ३६ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आशाबाई हेमराज पाटील (वय-४०) रा. आसनखेडा ता. पाचोरा जि.जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता त्या जळगाव कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान काम आटोपून त्या बसमध्ये पाचोरा जाण्यासाठी बसल्या होत्या.  त्यावेळी त्यांच्या जवळील बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम सोन्याची चैन आणि १ हजार २०० रूपयांची रोकड असा एकुण ३६ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार माहिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी २३ एप्रिल रोजी रात्री एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहे.

Protected Content