मुंबई वृत्तसंस्था । तुम्ही दहावी पास आहात आणि तुमच्या आयटीआय सर्टीफिकेट आहे तर तुम्हीही सरकारी नोकरी मिळवू शकता. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डतर्फे तब्बल ६०६० पदांची मेगाभरती निघाली असून याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डमार्फत विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. अर्जदाराचे वय कमीत कमी १५ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष असावे. जनरल आणि ओबीसीच्या अर्जदारासाठी परिक्षा शुल्क १०० रूपये असून इतरांसाठी कोणतेही शुल्क नाही. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डत Non-ITI Category मध्ये २२१९ तर ITI Category मध्ये ३८४७ जागांची भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
Non-ITI Category :- १0 वी उत्तीर्ण
ITI Category :- १0 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण व NCVT किंवा SCVT मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेचे संबंधित व्यापार प्रमाणपत्र.