मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातील एकाचे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात वसंता दामु बेलदार (वय ५२) हे मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. २७ मार्च रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. हा प्रकारसमोर आल्यानंतर वसंता बेलदार यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण हे करीत आहे.




