Home क्राईम रावेर येथे गोदाम फोडून चोरी करणाऱ्यास अटक

रावेर येथे गोदाम फोडून चोरी करणाऱ्यास अटक


e64965dd 3f00 434f 81aa 4d5e6dec39b6

रावेर (प्रतिनिधी) येथील किराणा मालाच्या गोदामाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्यास पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले असून चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनिल सुपारी भांडार या किराणा दुकानाचे मालक यांनी फिर्याद दिली होती की, त्यांचे शहरातील सावदा रोड लगत असलेल्या पी ई तात्या मार्केट मधील गोदामात ठेवलेले इस्माईल नावाच्या बिडीचे दोन खोके चोरीला गेले असल्याने आढळल्याने त्यांनी शेजारी असलेले अमय टायर्स आणि प्रसाद इलेक्ट्रिक दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता गोदामाचे कुलूप तोडतांना त्यांना जावेद नावाचा चोरता आढळून आला. त्याच्याविरुद्ध गुरन ८३/१९ भादवी कलम ४६१,३८० याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका इस्माईल शेख, विकास पोहेकर, बारात सुपे, गणेश रोहिल, श्री म्हस्के यांनी करून या गुन्हातील संशयित आरोपी जावेद मुबारक तडवी (रा. रावेर) याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. जावेद याने चोरीची कबुली दिली आहे. जावेद अनिल सुपारी भांडार याठिकाणी कामाला होता परंतु २ ते ३ वेळा त्याने किरकोळ चोरी केल्याचे आढळून आल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound