जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये २०१६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची अल्युमनी मिट नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाला २०१६ बॅचच्या दीक्षा धनविजय आणि कृतिका धमादे यांनी विशेष उपस्थिती लावली.
या मिट दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या अनुभवांचा आदान-प्रदान केला. २०१६ पासून २०२४ पर्यंतच्या कार्यकाळात कॉलेजमध्ये झालेल्या विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या भौतिक, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.अल्युमनी मिटने महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये एक स्नेहपूर्ण नाते निर्माण करण्यास हातभार लावला. महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.