जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यासाठी लेटेक्स सॉप्टवेअरवर नुकताच सेमीनार आयोजन करण्यात आला होता.
लेटेक्स हे एक सॉप्टवेअर आहे ज्यात जागतिकप्रतीच्या मानाकंनाचे प्रकल्प, शोध निबंध व इतर रिपोर्टस विद्यार्थी तयार करु शकतात.
याप्रसंगी संगणक विभागातील प्रा.माधुरी झंवर यांनी लेटेक्सचे महत्व विशद केले. लेटेक्स मध्ये टेबल्स, फिगर्स, बुलदेस, नंबर्स, कॉलम कन्टेंट, फॉन्ट साईज, चापटर्स, टेबल ऑफ कन्टेंट, इंडेक्स या सर्व बाबीचे जनरेशन कसे करायचे याबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देत प्रकल्प लिखाण, रिपोर्ट लेखनासाठी लेटेक्स हा उपयुक्त पर्याय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रा.जयश्री पाटील यांनी समन्वयक म्हणुन काम पाहिले. यावेळी प्रा.प्रमोद गोसावी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी नेहा कोलते हिनेे केले.