जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व रोटरी क्लब जळगाव एलाइट यांच्या संयुक्त विदयमाने महाविद्यालय परिसरातप्रा. डॉ. चेतन सरोदे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात विविध जातीच्या वड, आंबा आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. चेतन सरोदे यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून जास्तीतजास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मानव साक्षर जरी झाला, तरी त्याला खर्या अर्थाने पर्यावरणीय साक्षर होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने पर्यावरणदूत म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे रोटारियन प्रा. प्राजक्ता पाटिल, प्रा. चंद्रकांत डोंगरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.