गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे हिवाळी परिक्षेत १०० टक्के यश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा हिवाळी एम एस्सी व्दितीय वर्ष निकाल नुकताच घोषित झाला असून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करीत १०० टक्के निकाल लागला आहे.

स्वरूपा कामडी ही ८०.५ प्रथम,रितेश पडघन ७६.१६ व्दीतीय, भुपेंद्र राजपूत सयुक्तरित्या ७२.८३ तृतीय, क्रमांकाने उर्तीण झाले तसेच सर्वच्या सर्व विदयार्थी देखिल उर्तीण झाले आहे. या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, प्राचार्य प्रो.विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content