Home राजकीय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन


manohar parrikar 1521032368 1

गोवा (प्रतिनिधी) काही महिन्यापासून गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन देशभरात प्रचंड अफवा पसरत होत्या. परंतु आज अखेर पर्रीकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.

मनोहर पर्रीकर यांचा गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. त्यामुळे त्यांना झोपूनच रहावे लागत होते. कमी रक्तदाबामुळे पर्रीकर यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र, काल सकाळच्यातुलनेत आज स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून पर्रीकर यांची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound