नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाल्यामुळे आम आदमी पक्षाने केंद्राच्या या निर्णयावर सडकून टिका करत संघालाही लक्ष्य केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. यासोबत दिवंगत नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी या निर्णयांचे स्वागत केले. तथापि, आम आदमी पक्षाने प्रणव मुखर्जी यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी ट्विट करून संघ शाखेत जा…आणि भारतरत्न मिळवा अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शेलकी टीका केली. भाजपने भारतरत्न योजना अंमलात आणल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
प्रणव मुखर्जी हे अलीकडेच संघाच्या व्यासपीठावर गेले होते. त्यांचा हा निर्णय वादाच्या भोवर्यात सापडला होता. यानंतर त्यांना भारतरत्न जाहीर झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. संघासमोर झुकल्यानेच त्यांना भारतरत्न मिळाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान, आपच्या या टिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप याला काय प्रत्युत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा की भारत रत्न योजना "एक बार संघ की शाखा में जाओ भारत का रत्न बन जाओ" मज़ाक़ बना दिया भारत रत्न का।
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) January 25, 2019