स्व.ओंकार वाघ यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवनगौरव सन्मान

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामगौरव फाउंडेशनच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्याचे सहकार व शिक्षण क्षेत्रातील अग्रणी स्व. ओंकार आप्पा वाघ यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान झाला.

जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या महनीय व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाला उजाळा मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानमर्मी सन्मान सोहळ्याचे आयोजन होते. सर्व सन्मान झालेल्या शिक्षण पंढरीच्या वारकऱ्यांची प्रेरणागाथा म्हणून काढण्यात येणाऱ्या ‘ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे सुद्धा यावेळी अनावरण करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या देखण्या सोहळ्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा दूध संघांचे चेअरमन आ.मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल सिंघेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, मधुस्नेह संस्था परिवाराचे धनंजय चौधरी,पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक अॅड. अविनाश भालेराव, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे,ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी, इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, उद्योजक रवींद्र नवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. ओंकार आप्पा वाघ यांनी जिल्ह्याच्या विशेषतः पाचोरा व भडगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचे मरणोत्तर ऋणनिर्देश करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध दिवंगत नामवंत व्यक्तीमत्व व विद्यमान अशा २९ शिक्षण संस्थाचालकांना सुद्धा ज्ञानमर्मी सन्मान प्रदान करण्यात आला.पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने यांनी हा सन्मान स्वीकारला.

Protected Content