Home Cities धरणगाव धरणगाव येथे भाजपातर्फे अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा गौरव

धरणगाव येथे भाजपातर्फे अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा गौरव


धरणगाव प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर व तालुकाच्या वतीने अयोध्येला गेलेल्या कारसेवकांना सन्मानपत्र व गुलापुष देवून सत्कार केला. यावेळी काही कारसेवकांनी अंगावर शहरे आणणारे अनुभव कथन केले.

याप्रसंगी काही कारसेवकांनी अंगावर शहारे आणणारे अनुभव कथन केले. ज्यात अरूण चौधरी, आनंदा धनगर, कमलेश तिवारी, रघुनाथ चौधरी यांनी त्या ठिकाणचे अनुभव कथन केले. तसेच तालुकाध्यक्ष संजय भाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी कारसेवकांप्रती व प्रभु श्रीराम मंदिराप्रती मनोगत व्यक्त केले. दिलिप पाटील यांनी समारोपपर कारसेवकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला व आयोजकांना कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा गटनेते कैलास माळी, कमलेश तिवारी, दिलिप महाजन, सुनील चौधरी, ललित येवले, दिपक चौधरी, सचिन पाटील, इच्छेश काबरा, कन्हैया रायपुरकर, धिरज बागुल, भिकन गुरव, मयुर बयस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारणी सदस्य शिरिष बयस, शेखर पाटील, भास्कर मराठे, रामचंद्र शिंदे, अॅड. बापुसाहेब भोलाणे, मधुकर रोकडे, नगरसेवक गुलाब मराठे, भालचंद्र जाधव, शरद कंखरे, हितेश पटेल, राजेंद्र महाजन, शुभम चौधरी, अमोल कासार, संजय पाटील, किशोर माळी उपस्थित होते. सन्मानपत्राची कल्पना व शब्दांकन महेश आहेराव यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत कारसेवकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


Protected Content

Play sound