मुक्ताईनगर आगाराचे वाहक सरला पाटील यांचा गौरव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर डेपोच्या कंडक्टर सरला पाटील यांचा प्रवाशांशी नम्रपणे वागणे ज्येष्ठ नागरिक व अपंगांना व्यवस्थित मार्गदर्शन करून जागा करून देणे, प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन एसटीचे उत्पन्न कसे वाढेल यावर भर देणे, एस टी महामंडळात सेवा करताना सामाजिक बांधिलकी जोपासणे बहुजन हिताय बहुजन सुखाय या एसटीच्या ब्रीदवाक्या प्रमाणे प्रवाशांना सेवा देत असल्यामुळे मुक्ताईनगर ते काटेलधाम बसने प्रवासी घेऊन जात असताना एन जी शेजोळे ब्रंच मॅनेजर जिल्हा बँक शाखा निमखेडी यांनी एसटीला मोठा हार बांधून कंडक्टर सरला पाटील व बस ड्रायव्हर जी डी माळी यांचा निमखेडी येथे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. त्यावेळी इच्छापूर वि. का. सोसायटीचे सचिव एकनाथभाऊ लोणे बँकेचे शिपाई राहुल जाधव आणि निमखेडी गावातील गावकरी उपस्थित होते या अचानक झालेल्या सत्कारामुळे कंडक्टर सरला पाटील आणि ड्रायव्हर जी डी माळी आनंदीत झाले

Protected Content