Home धर्म-समाज सामाजिक कार्याचा गौरव: किनगावच्या पाटील दाम्पत्याचा पंढरपूर येथे सन्मान

सामाजिक कार्याचा गौरव: किनगावच्या पाटील दाम्पत्याचा पंढरपूर येथे सन्मान

0
223

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव आणि स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष, मनीष विजयकुमार पाटील यांचा पंढरपूर येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे. सवर कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जी. मनियार, डॉ. वृणाल मोरे आणि डॉ. प्राजक्ता मोरे यांनी मनीष पाटील आणि त्यांच्या पत्नी पूनम पाटील यांना शाल-श्रीफळ आणि विठ्ठलाची प्रतिमा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्याची दखल
विजयकुमार देवचंद पाटील (व्ही.डी. नाना) आणि मनीष पाटील यांनी पंढरपूर येथे भक्तांच्या निवास आणि भोजनासाठी श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोठा मठ उभारला आहे. या मठात दरवर्षी पंढरीच्या वारीत येणाऱ्या असंख्य भाविकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येते. याशिवाय, मनीष पाटील हे स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व गरीब लोकांना सातत्याने मदत करत असतात. त्यांचा हा सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे सुरू आहे. मनीष पाटील हे अचल फार्मसी आणि संजीवन हॉस्पिटल, डेक्कन पुणेचे संचालक असून, त्यांचे फार्मा क्षेत्रातही मोठे योगदान आहे.

अभिनंदनाचा वर्षाव
मनीष पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन सवर कॉलेज ऑफ फार्मसीने केलेला हा सन्मान त्यांच्या सर्वच कार्याचा गौरव आहे. या सन्मानाबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल, किनगावचे संस्थापक अध्यक्ष व्ही.डी. पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनीष पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. पूनम पाटील यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे त्यांच्या कार्याला नवीन ऊर्जा मिळाली असून, भविष्यात ते अधिक जोमाने कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound