यावल प्रतिनिधी । बिहार विधानसभा निवडणुक प्रचारार्थ भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या प्रचारात अंधाधुंध गोळीबार झाल्याप्रकरणी आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी “भीम आर्मी” यावल तालुका युनिटच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे.
निवेदना म्हटल्याप्रमाणे, बिहार विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या निवडणुकीत एका उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भीम आर्मी संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या प्रचार मिरवणुकीवर काही विरोधकांनी अंधाधुध केलेल्या गोळीबार करून दहशत माजवण्याचा कुटील प्रयत्न करण्यात आल्याची अत्यंत खेदजनक व देशातील लोकशाहीला लाजवणारी घटने घडली असुन या घटनेचा गांभीर्याने विचार करून,वरीष्ठांच्या आदेशाने “भीम आर्मी” यावल तालुका युनिट च्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद यांना कायमस्वरूपी झेड प्लस सुरक्षा प्रदान करून गोळीबार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या आशयाचे मागणीचे निवेदन तहसीलदार यावल यांना देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास भीम आर्मीच्या वतीने लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.
सदर निवासी नायब तहसीलदार आर .के. पवार यांना देण्यात आलेल्या निवेदन समयी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रमाकांत भाऊ तायडे,जळगांव जिल्हा सचिव सुपडू भाऊ संदानशिव,यावल तालुका प्रमुख हेमराज तायडे, यावल तालुका सचिव प्रशांत तायडे, कोषाध्यक्ष शिवाजी गजरे, सचिन वानखेडे, अजय वानखेडे व “भीम आर्मी” यावल तालुका युनिटचे अनेक पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने हजर होते.