नागपूर (वृत्तसंस्था) खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या द्या. अन्यथा यमराजाचे बोट बॉम्बच्या रिमोटवर आहे, असा आक्षेपार्ह मजकूर असलेले कागद नागपूर शहरातील बस स्थानकावर चिपकवण्यात आले आहे. या कागदांवर थेट भारत सरकार धमकी देण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून यंत्रांनी तपासाला सुरुवात केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, नागपुरातल्या शहर बस सेवेच्या स्टॉपवर आक्षेपार्ह मजकूर असणारे कागद चिकटवण्यात आले आहेत. या मजकूरात भारत सरकार आणि कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यावरुन मजकूर लिहिण्यात आले आहे. या मजकुरात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देण्यात आली आहे. यमराजाचे बोट बॉम्बच्या रिमोटवर आहे, “धमकी जर गांभीर्याने घेतली नाही तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पोहचवू” असेही या धमकीच्या कागदावर म्हटले आहे. तसेच आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत, अशा स्वरुपाचा मजकूर देखील कागदात लिहिलेला आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातल्या बस स्टॉपवर हे कागद चिकटवलेले पाहायला मिळाले आहे. हा धमकीचा मजजकूर तीन पानी आहे. दरम्यान, या कागदांमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून यंत्रणा सतर्क झालेल्या आहे.