बोदवड (प्रतिनिधी) तेलंगणा राज्यातील वरंटल येथे छतावर झोपलेल्या नाभिक दाम्पत्याच्या चिमुकलीस उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना १८ जून रोजी घडली होती. संपूर्ण तेलंगणा राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संपूर्ण राज्यातील नाभिक बांधवांनी दोन दिवस दुकाने बंद ठेऊन मोर्चा काढला व आरोपीस अटक करण्यात येऊन फाशीची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातही नाभिक समाजाने मारेकरी आरोपी प्रवीण यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
बोदवड येथील नाभिक समाज बांधवांकडून आज (दि.२४) रोजी तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येऊन आरोपीस फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नाभिक संघटनेचे संतोष कुंवर, संजय वाघ, अनिल कळमकर, विवेक वखरे, राजू डापसे, हरिभाऊ सुंरशे, अमोल आमोदकर, संजय बिडके, धनराज शेळके, गणेश सोनवणे, योगेश वखरे, सोपान महाले, कैलास सुंरशे, आकाश सोनवणे, गणेश शेळके व अनेक नाभिक समाज बांधव उपस्थित होते.