नवी दिल्ली, वृत्तसेवा । मला अशा आहे की खासदार एकजूट होऊन आम्ही देशातील जवानांसोबत असल्याचा संदेश देतील असा आशावाद पंतप्रधान मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सुरु होण्यापूर्वी चीन सोबत सुरु असलेल्या सीमा वादाबाबत व्यक्त केला. आजपासून संसदेचा पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मला आशा आहे की खासदार एकजूट होऊन संदेश देतील की आम्ही देशातील जवानांसोबत उभे आहोत’ असं म्हणत विरोधकांना आवाहन केलंय. हिंमत, उत्साह आणि आत्मविश्वासासह आपल्या सेनेचे वीर जवान सीमेवर उभे आहेत. दुर्गम भागांत ते देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. काही वेळातच वर्फाचा वर्षावही सुरू होईल. ज्या विश्वासासोबत ते उभे आहेत, सदनाचे सर्व सदस्य एक स्वर, एक भाव, एक भावना आणि एका संकल्पानं हा संदेश देतील, की देश सेनेच्या जवानांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. संसद आणि संसदेतील सदस्यांच्या माध्यमातून देश उभा आहे. हाच मजबूत संदेश हे सदनदेखील देईल. सर्व माननीय सदस्यांच्या माध्यमातून देईल, अशी वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीत.