चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा धरण हे पूर्ण भरले असून आज सकाळी यातून नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गिरणा धरणाच्या उगम क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने दिनांक १६ च्या रात्री गिरणा धरण १००% भरले आहे. आज पहाटे नऊ वाजता या धरणातून १५०० क्युसेस पाणी सोडण्यात आले असून आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाची झळा सोसणार्या गिरणा पट्ट्यातील शेतकर्यांच्या आशा या मुळे पल्लवित झाल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. गिरणा धरण पूर्णपणे भरल्यामुळे भडगाव, पाचोरा व जळगाव या तालुक्यांमध्ये असलेले पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष आता दूर होणार असून येणार्या दोन वर्षांकरता पिण्याच्या पाण्याची समस्या जवळपास दूर झाली असल्याने या तालुक्यातही आनंद व्यक्त केला जात आहे.
पहा : गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग होणार्या क्षणाचा व्हिडीओ.