नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाच्या पहिल्या चार मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीत श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होवून मोठे यश मिळविले आहे.
तिच्या पाठोपाठा श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.
यावर्षी ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या निवडप्रक्रियेत महाराष्ट्रातील ४७ उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं ९७ वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं २०३ वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने २४८ वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने ४५१वा आणि अश्विन गोळपकरने ६२६ वा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या दहा नंबरवर आलेले विद्यार्थी
पहिला क्रमांक : श्रुती शर्मा, दुसरा क्रमांक : अंकिता अग्रवाल, तिसरं क्रमांक : गामिनी सिंगला, चौथा क्रमांक : ऐश्वर्य वर्मा, पाचवा क्रमांक : उत्कर्ष द्विवेदी, सहावा क्रमांक : यक्ष चौधरी, सातवा क्रमांक :सम्यक एस जैन, आठवा क्रमांक : इशिता राठी, नववा क्रमांक : प्रीतम कुमार, दहावा क्रमांक : हरकीरत सिंह रंधावा
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा 2021 चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज निकाल जाहीर झाला आहे. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.